रत्नागिरी : घरगुती उपकरणे तसेच वस्तू पुरवणाऱ्या कंपनीच्या कार्यालयात नोकरी करणाऱ्या कामगाराने कार्यालयामध्ये जमा झालेली सुमारे ७५ हजार ३०० रुपयांची रोकड लांबवली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्य सुमारास टीआरपी येथे घडली. सागर रामलिंग कदम (सध्या रा. नाचणे, मूळचा रा. पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित कामगाराचे नाव आहे. त्याच्याविरोधात गणेश कृष्णा जाधव (४१, सध्या रा. टीआरपी, मूळ रा. कोल्हापूर) यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार गणेश जाधव यांचे टीआरपी येथे होम अप्लायन्सेसचे कार्यालय आहे. कार्यालयात सुमारे ७५ हजार ३०० रुपयांची रोख रक्कम जमा झालेली होती.
