विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा ताफा येण्यापूर्वी रस्त्यावरील कारवर कोसळला वटवृक्ष, कारचं मोठं नुकसान

0

औरंगाबाद : आज केंद्रिय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या नेतृत्वात औरंगाबादेत राष्ट्रीय पातळीवरील बँक अधिकाऱ्यांची अत्यंत महत्त्वाची बैठक संपन्न होत आहे. याकरिता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित आहेत. मात्र फडणवीसांचे शहरात आगमन झाले, त्या वेळेआधीच एक मोठी दुर्घटना त्यांच्या मार्गावर घडली. दैव बलवत्तर आणि माजी मुख्यमंत्री या दुर्घटनेतून बचावले असेच म्हणावे लागेल. त्यांच्या मार्गातील एक महाकाय वडाचा वृक्ष कोसळून पडला. मात्र फडणवीस येण्याआधीच हा वृक्ष मार्गावरून तत्काळ काढून घेण्यात आला. औरंगाबाद विमानतळापासून ताज हॉटेलकडे येणाऱ्या मार्गात मुकुंदवाडी परिसरातील एक महाकाय वटवृक्ष कोलमडून पडला. जालना रोडवरील मुकुंदवाडी परिसरातील संजयनगर कमानीजवळ ही घटना घडली. दुपारी साधारण 1.15 वाजेच्या सुमारास रस्त्याजवळील भलामोठा वटवृक्ष निखळला. रस्त्यावरील एका कारवर तो पडल्यामुळे कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र काही वेळानंतर लगेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या मार्गावरून जाणार असल्याने आपत्कालीन पथक त्या ठिकाणी तातडीने आले आणि या मार्गावरून वृक्ष काढून टाकण्यात आला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:13 PM 16-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here