आता रेल्वे प्रवासात बिनधास्त झोपा, तुमचं स्टेशन आल्यावर तुम्हाला झोपेतून उठवलं जाईल…

0

ट्रेनचा प्रवास करत असताना अनेकदा लोक झोपत असतात. बसायला आरामदायक जागा मिळाल्यानंतर प्रवास करत असलेले लोक विश्रांती घेण्यासाठी डोळे बंद करतात. पण एकदा की झोप लागली की त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. कारण स्टेशन निघून गेल्यानंतर जाग आली की एकच गोंधळ उडतो. तुमच्याही बाबतीत असं होत असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वेचा प्रवास आरामदायक बनवण्यासाठी रेल्वेने फोन कॉल सेवा दिली आहे. या सेवेचा वापर करून रेल्वे प्रवाश्यांना स्थानकावरून गाडी निघाल्यानंतर विचार करत जागं राहावं लागणार नाही. ही सेवा आईआरसीटीसी आणि बीपीओ यांच्या संयुक्त विद्यामाने सुरू होणार आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रवाश्यांना १३९ या क्रमांकावर फोन लावायचा आहे. या सेवेमार्फत स्टेशन येण्याच्या आधी म्हणजेच इच्छित स्थळाच्या अर्धा तास आधी प्रवाश्यांच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर फोन केला जाईल. कॉल अर्लटद्वारे झोपलेल्या प्रवाश्यांना स्थानक आल्याची आठवण करून देण्यात येईल. आईआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाईटवर या सेवेची माहिती देण्यात आली आहे. प्रवाश्यांना आपला पीएनआर नंबर, स्टेशनचे नाव, स्टेशनचा एसटिडी कोड ही माहिती द्यावी लागेल. प्रवाश्यांनी माहिती दिल्यानंतर सिस्टीम त्या ट्रेनच्या करंड स्टेटसची माहिती घेऊन सिस्टिमद्वारे वेकअप कॉल करण्यात येईल. १३९ हा इंक्वाईरी नंबर आहे. यात बदल करण्यात आले आहेत. ही सेवा अधिक विश्वसनीय करण्यासाठी रेल्वेकडून प्रयत्न केले जात आहेत. १३९ या क्रमांकावर रेल्वेचे रिजर्वेशन, सिट्सची उपलब्धता आणि ट्रेन प्लॅटफॉर्मची स्थिती याबाबत माहिती दिली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here