सप्तलिंगी नदीत पोहायला गेलेले संजय घाटकर दुसऱ्या दिवशीही बेपत्ता

0

संगमेश्वर : तालुक्यातील देवरूखजवळील पूर-झेपलेवाडीतील संजय सीताराम घाटकर (वय ४८) हे बुधवारी सायंकाळी सप्तलिंगी नदीपात्रात पोहायला गेले असता बेपत्ता झाले. त्यांचा दुसऱ्या दिवशीही ग्रामस्थांकडून शोध घेण्यात आला. परंतु ते मिळून आले नाहीत. पूर-झेपलेवाडीतील दहाजण येथील ‘जांभळाचे उतरण’ याठिकाणी सप्तलिंगी नदीपात्रात बुधवार, दि. १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास पोहण्यासाठी गेले होते. यापैकी अशोक झेपले (वय ५०), संजय घाटकर (४८) व हर्ष घाटकर (१५) हे तिघेजण पाण्यात उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्यामुळे हे तिघेजण पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले. याचवेळी संजय घाटकर हे अचानक दिसेनासे झाले व पाण्यातून बेपत्ता झाले. तर अशोक झेपले व हर्ष घाटकर यांना इतर सहकाऱ्यांनी पाण्यातून बाहेर काढले व उपचारासाठी देवरूख ग्रामीण रुग्णालयात आणले. याठिकाणी डॉक्टरांनी तपासल्यानंतर अशोक झेपले यांना मृत घोषित केले. तर हर्ष घाटकर याच्यावर उपचार करून त्याला घरी सोडण्यात आले आहे. बेपत्ता असलेल्या संजय घाटकर यांचा बुधवारी ग्रामस्थ व राजू काकडे हेल्प अॅकॅडमीचे कार्यकर्ते यांनी शोध घेतला. मात्र, सायंकाळपर्यंत घाटकर यांचा थांगपत्ता लागला नाही. शुक्रवारीही हे शोधकार्य सुरू राहील, असे गावचे पोलिस पाटील सुरेश वेल्ये यांनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:16 AM 17-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here