उरुसाला जात असताना तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

0

रत्नागिरी : तालुक्यातील नरवणेवाडी-नाखरे येथील तरुण हातिसच्या उरुसाला जात असता फणसोप बायपास वळणावर अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. अनिकेत अरुण शिंदे (वय २५, रा. नरवणेवाडी-नाखरे, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. ९) रात्री सव्वाबाराच्या सुमारास फणसोप हायस्कूल बायपास रस्त्यावर घडली. फणसोप बायपास वळणावर दुचाकीचा ताबा सुटून दुचाकी रस्त्याच्या बाहेर जाऊन मोरीवर आदळली. या अपघातात शिंदे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

IMG-20220514-WA0009


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here