नोंदणी व मुद्रांक विभागातील प्रलंबित मागण्यांसंदर्भात अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटनेचा बेमुदत संपाचा इशारा

0

रत्नागिरी : प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभाग अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या वतीने बेमुदत संपाचा इशारा देण्यात आला आहे. नोंदणी व मुद्रांक विभाग अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांचेकडून शासनाकडे मागील 3 ते 4 वर्षापासून विविध मागण्यांबाबत निवेदन सादर करण्यात आलेले आहेत. सदर मागण्या खालीलप्रमाणे:

  1. नोंदणी व मुद्रांक विभागातील सर्व संवर्गातील मागील पाच ते सहा वर्षांपासून रखडलेल्या पदोन्नत्या त्वरीत करणे.
  2. पदोन्नतीची कार्यवाही पुर्ण झाल्याशिवाय नवीन सेवा प्रवेश नियम लागू न करणे.
  3. विभागातील सर्व रिक्त पदे तात्काळ भरणे.
  4. कोवीड-१९ मुळे मयत झालेले विभागातील अधिकारी/कर्मचारी यांचे कुटूंबियांना तात्काळ ५० लाखाची मदत देणे व कुटूंबातील एका व्यक्तीस अनुकंपा तत्वावर विभागात नोकरीत सामावून घेणे.
  5. मुंबई शहरातील मुद्रांक जिल्हाधिकारी यांची पदे विभागातील पदोन्नतीने भरणे.
  6. स्विय प्रपंची लेख्यातील रक्कम विभागातील कार्यालयांच्या व जनतेच्या सुविधेकरीता वापरणे.
  7. तुकडेबंदी तसेच रेरा कायद्यान्वये नोंदणी विभागतील अधिकारी/कर्मचारी यांचेवर करण्यांत आलेल्या कार्यवाह्या मागे घेणे.
  8. हार्डवेअर साहित्य उच्च दर्जाचे पुरविणे.
  9. आय-सरिता, ई-फेरफार तसेच इतर सर्व्हरच्या अडचणी तात्काळ दुर करणे.
  10. आयकर विभागाकडील विवरण पत्र, पोलीस विभाग व इतर विभागाकडून मागणी करण्यांत आलेल्या माहिती केंद्रीय सर्व्हरवरून पुरविणे.
  11. नोंदणी अधिकारी यांचेविरुध्द विनाकारण दाखल होणारे गुन्हे मागे घेणे.
  12. नविन आकृतीबंधानुसार शिपाई संवर्गातील पदे निरसित न करता कायम ठेवणे.
  13. निनावी व त्रयस्थ व्यक्तीव्दारे होणाऱ्या तक्रारीचे आधारे कार्यवाही प्रस्तावित न करणे.
  14. सह दुय्यम निबंधक वर्ग-२ व दुय्यम निबंधक श्रेणी-१ संवर्गाचे एकत्रीकरण करणे.
  15. पदनामामध्ये बदल करणे.
  16. विभागीय पदोन्नती समितीमध्ये संघटनेचा एक प्रतिनिधी घेणे.
  17. खात्याची विभागीय परीक्षा प्रत्येक वर्षी घेणे.
  18. विभागीय चौकशीची कार्यवाही विहीत मुदतीत पार पाडणे.
  19. सर्व संवर्गातील अधिकारी/कर्मचारी यांचे गोपनिय अहवाल दरवर्षी विहीत मुदतीत प्राप्त करुन घेवून अद्यावत ठेवणे.
  20. शासन निर्णयानुसार पदोन्नतीची कार्यवाही करतांना त्या वर्षी रिक्त असलेली पदे त्याच वर्षात
    भरणे.
  21. बदल्या करतांना संघटनेस विचारात घेणे.
    इत्यादी मागण्याबाबत तसेच शासनाकडून दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये कोणत्याही सोयी सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत.
    सदरच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभाग अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी यापुर्वीच घोषीत केल्याप्रमाणे दि. 21.09.2021 पासून बेमुदत संप पुकारण्याचा निश्चय केला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:29 PM 17-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here