आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात ओझोन दिन उत्साहात साजरा

0

देवरूख : देवरूख येथील आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय ओझोन दिवस उत्साहात साजरा झाला. देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर विद्यार्थ्यांना माहिती देताना म्हणाले, ओझोन वायू वसुंधरेचे संरक्षक कवच असून ते कवच अबाधित ठेवण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी करावा. तो संकल्प समाजापर्यंत घेऊन जावे. प्रा. धनंजय दळवी यांनी ओझोनचे छत्र अखंडित राहण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने कोणत्या गोष्टी कराव्यात आणि टाळाव्यात, तसेच ओझोन थर विरळ झाल्यास त्याचे कोणते दुष्परिणाम मानवास भोगावे लागतील, याबाबत सविस्तर आढावा घेतला. निसर्ग मंच प्रमुख प्रा. मयूरेश राणे यांनी सांगितले की, ओझोन वायूचा थर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वर १५ ते ३० किलोमीटरच्या पट्ट्यात असतो आणि तो सूर्यापासून निघणारी घातक अतिनील किरणे थांबवू शकतो. यामुळे तापमानात वाढ कमी होण्यास मदत होते. हा थर कमी झाला, तर तापमानात वाढ होऊन ऋतुचक्र सतत बदलत राहील. यामुळे मानवाला त्वचेचा कर्करोग, दृष्टिविकार यासारखे गंभीर आजार होऊ शकतात. ओझोनच्या वातावरणातील पुरेशा प्रमाणामुळे निसर्ग आणि सजीव सृष्टी यांच्या जीवनसाखळीला धोका निर्माण होत नाही. म्हणूनच ओझोन वायूचे कवच अखंड राहण्यासाठी आपण सर्वांनी हातभार लावण्याचे आवाहन प्रा. राणे यांनी केले. ग्रंथालय विभागातर्फे प्रा. सुभाष मायंगडे यांनी विद्यार्थ्यांसाठी दोन माहितीपट उपलब्ध करून दिले. त्यामध्ये ”ओझोन थराचे जतन – जनजागृती” हा डी डी सह्याद्री वाहिनीचा माहितीपट आणि अभ्यास मित्राच्या माहितीपटाद्वारे ओझोन म्हणजे काय, ओझोनचे कार्य, ओझोनमुळे सजीवांची होणारे संरक्षण आणि ओझोन थर नष्ट होण्याची कारणे याबाबतची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांसाठी प्रसारित करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील निसर्ग मंच विभाग, प्रसिद्धी विभाग आणि ग्रंथालय विभागाने केले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:46 PM 17-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here