पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी देशात लसीकरणाचा विक्रम; एकाच दिवसात दोन कोटी नागरिकांना डोस

0

नवी दिल्ली : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असताना देशातील लसीकरणाच्या कार्यक्रमाने गती घेतली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी आज एकाच दिवसात देशात दोन कोटीहून अधिक नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली असून हा एक जागतिक विक्रम आहे. भारतात जगातील सर्वात मोठा लसीकरणाचा कार्यक्रम सुरु असून आतापर्यंत चार वेळा एक कोटीपेक्षा नागरिकांना लस देण्यात आले आहे.
भारताने कोरोना लसीकरण मोहीमेत आज नवा रेकॉर्ड बनवला आहे. देशात आज (17 सप्टेंबर) दुपारी तीन वाजेपर्यंत दीड कोटी नागरिकांना कोरोना लस देण्याचा विक्रम झाला आहे. या अगोदर 27 ऑगस्टला 1.03 कोटी नागरिकांना डोस देण्यात आले. 31 ऑगस्टला 1.33 कोटी नागरिकांना डोस देण्यात आला. 6 सप्टेंबर 1.13 कोटी नागरिकांना लस देण्यात आली आहे. तर आज 17 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी दीड कोटीपेक्षा अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. आज दोन कोटी नागरिकांना लस देण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री मनसुख मंडविया यांनी दिली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
8:07 PM 17-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here