२१ वर्षीय तरुणाचे अपहरण केल्याप्रकरणी पूर्णगड पोलिसांनी ६ जणांच्या मुसक्या आवळल्या

0

रत्नागिरी : तालुक्यातील पावस एस. टी. स्टँड येथून २१ वर्षीय तरुणाचे अपहरण केल्याप्रकरणी पूर्णगड पोलिसांनी ६ जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. विशाल विलास रजपूत वय २१ या तरुणाला पावस एस. टी. स्टँड येथे मारहाण करीत जबरदस्तीने टाटा सुमो गाडीत बसवून पळवून नेल्याची तक्रार मनोज मंगेश शिर्के वय २१ रा. नालासोपारा यांनी पूर्णगड पोलिसात दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी संतोष गोविंद ठीक वय ४७, रा. शिरगाव तीवंडेवाडी, राजू रूपसिंग राठोड, रा. कोकणनगर, शाकील सोहेल बोडेकर, रा. कीर्तीनगर, विजय बाबल्या तावरे, रा. शिरगाव तीवंडेवाडी,,अब्दुल गनी अब्दुल सत्तार शेख, रा. कोकणनगर व अन्य एका आरोपीच्या मुसक्या आवळल्या असल्याची माहिती पोलीस निरीक्षक गावित यांनी दिली आहे. याप्रकरणी पूर्णगड पोलीस स्थानकात भा.दं.वि.क. ३६३,३२३,५०४,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
12:26 PM 18/Sep/2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here