रत्नागिरी निवासी उपजिल्हाधिकारीपदी सुशांत खांडेकर यांची नियुक्ती

0

रत्नागिरी : जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड यांची सिंधुदुर्गचे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे तर सावंतवाडी येथे प्रांताधिकारी म्हणून कार्यरत असलेले सुशांत खांडेकर यांची नियुक्ती रत्नागिरीचे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे. खांडेकर यांनी या पूर्वी राजापूरचे प्रांत तसेच रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात काम पाहिले आहे.

राजापूरचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी म्हणून सुशांत खांडेकर यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने छाप पाडली होती. तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. राजापूर येथून त्यांची सिंधुदर्ग जिल्ह्यात बदली झाली होती. सावंतवाडी येथे त्यांनी आपल्या कामाची छाप पाडली आहे. रत्नागिरीचे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांची बदली झाली आहे. मंगळवारी ते आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. रत्नागिरीतून दत्ता भडकवाड यांची सिंधुदुर्गच्या निवासी उपजिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. कोव्हीड महामारीच्या काळात श्री. भडकवाड यांनी जिल्हयात उत्कृष्ट काम पाहिले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात महसूलच्या तहसीलदार म्हणून काम पाहणाऱ्या सौ. राजश्री मोरे यांची खेडच्या प्रांताधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागा सिंधुदुर्गमधून आलेल्या तेजस्विनी पाटील यांना नियुक्ती देण्यात आली आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून श्रीम. रोहिणी रजपुत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीमती रजपूत यांनीही या पूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात काम पाहिले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:54 AM 20-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here