रशियातील पर्म स्टेट विद्यापीठात एका अज्ञात बंदूकधाऱ्याने हल्ला केल्याचं वृत्त आहे. या हल्ल्यात 8 जण ठार तर 14 जण जखमी झाले आहेत. हा हल्ला झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी इमारतीच्या खिडक्यांमधून उड्या मारल्या. पर्म स्टेट विद्यापीठ हे रशियातील प्रसिद्ध विद्यापीठ आहे. सोमवारी एका बंदूकधाऱ्याने या विद्यापीठावर हल्ला केला. हल्लेखोराने विद्यार्थ्यांच्या दिशेने गोळीबार करायला सुरुवात केली. या हल्ल्याची माहिती मिळताच काही विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या इमारतीतून उड्या मारल्या. या हल्ल्यात आठ जण ठार तर 14 जण जखमी झाले आहेत. सुदैवाने विद्यापीठाच्या सुरक्षा रक्षकांनी हल्लेखोरावर गोळ्या झाडून त्याला ठार केलं. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:27 PM 20-Sep-21