आंगणेवाडी यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री उदय सामंत यांनी आंगणेवाडी येथील नियोजनाचा आढावा घेत आंगणे ग्रामस्थांनी सुचवलेली कामे तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनास दिले आहेत. भाविकांसाठीच्या दर्शन व्यवस्था व प्रशासकीय सुविधांचा आढावाही घेण्यात आला आहे. आंगणेवाडी गाव दरवर्षी यात्रेच्या निमित्ताने लाखोंच्या संख्येने भाविक येतात. त्यांना सेवा सुविधा देण्याच्या दृष्टीने आंगणेवाडी गावच्या विकासासाठी 13 कोटींचा स्वतंत्र आराखडा बनवला जात आहे. आंगणेवाडीच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही, आंगणेवाडीसाठी मंजूर झालेला निधी आंगणेवाडीतच खर्च केला जाईल. जिल्हा नियोजनामधूनही निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांना मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांना दिली.
