महाविकासआघाडी सरकार येत्या ६ मार्चला अर्थसंकल्प मांडणार – ॲड.अनिल परब

0

राज्यातले महाविकासआघाडी सरकार येत्या ६ मार्चला अर्थसंकल्प मांडणार आहे. विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या २४ तारखेला सुरु होऊन २० मार्चला संपेल. महाराष्ट्र विधिमंडळाचे आर्थिक वर्ष 2020-21 मधील अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सुरू होणार आहे, अशी माहिती संसदीय कार्यमंत्री ॲड. अनिल परब यांनी दिली. विधान भवनात विधानसभा व विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी बोलताना परब म्हणाले, या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी चार आठवड्याचा निश्चित केला असून यात 18 दिवस कामकाज होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here