पालशेतच्या विद्यालयात कलादालनाचे उद्घाटन

0

गुहागर : पालशेत येथील रखुमाई पांडुरंग पालशेतकर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात कुमार प्रज्वल पंढरीनाथ गुहागरकर कलादालनाचे उद्घाटन करण्यात आले. चित्रशिल्पकार प्रकाश राजेशिर्के यांनी उद्घाटन केले. यावेळी स्थानिक स्कूल कमिटी सदस्य रवींद्र कानिटकर, पंढरीनाथ गुहागरकर, प्राजक्ता गुहागरकर, वास्तुशिल्पकार अनिकेत कुंभार, इंटीरिअर डिझायनर राहुल कुंभार, उपसरपंच महेश वेल्हाळ, स्कूल कमिटी सदस्य महेश तोडणकर, चंद्रहास चव्हाण आदी उपस्थित होते. कर्मवीर भाऊराव पाटील सभागृहात मान्यवरांना कर्मवीर भाऊराव पाटील यांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. कलादालनाचे निर्माते पंढरीनाथ गुहागरकर म्हणाले, माझा मुलगा (कै.) प्रज्वल याच्यासारखे विद्यार्थी घडविण्यासाठी या ठिकाणी कलादालनाची निर्मिती करण्यात आली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:09 PM 21-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here