गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या आर्ट्स फिल्म क्लबचा ‘फिल्म फेस्ट – २०२०’ हा चित्रपट महोत्सव नुकताच झाला. यात प्रामुख्याने भाषा, सामाजिक शास्त्रे आणि वाणिज्य विभागातील क्लबच्या सदस्यांना भावतील अशा प्रकारच्या सामाजिक विषयांशी निगडीत असलेल्या अंधाधुन, मांजा, बाजार, व्हर्टिकल लिमिट, उरी अशा आशयप्रधान चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात आले. महाविद्यालाच्या कै. डॉ. ज. शं. केळकर सेमिनार हॉलमध्ये महोत्सवाचा सांगता समारंभ पार पडला. यावेळी विज्ञानशाखेचे उपप्राचार्य प्रा. विवेक भिडे, फिल्म क्लबचे उपाध्यक्ष प्रा. वासुदेव आठल्ये, डॉ. अतुल पित्रे उपस्थित होते. या सर्व उपक्रमांमध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांचे विशेष प्रोत्साहन व विशेष मार्गदर्शन लाभले.
