मधमाशांनी घेतला 63 दुर्मिळ आफ्रिकन पेंग्विनचा जीव

0

मधमाशांच्या झुंडीने केपटाऊनच्या बाहेर समुद्रकिनाऱ्यावर 63 दुर्मिळ आफ्रिकन पेंग्विनना मारून टाकल्याचे उघड झाले आहे. मारल्या गेलेल्या पेंग्विनची प्रजाती ही नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे अशा प्रकारची घटना घडणं दुर्दैवी आहे. चाचणी केल्यानंतर पेंग्विनच्या डोळ्यांभोवती मधमाशांचे दंश आढळले. अशाप्रकारे मधमाशांनी तब्बल 63 पेंग्विनला मारणे ही एक अत्यंत दुर्मिळ घटना आहे, अशी माहिती फाऊंडेशनचे पशुवैद्यकीय अधिकारी डेव्हिड रॉबर्ट्स यांनी दिली. ज्या ठिकाणी मृत पेंग्विन आढळले त्या ठिकाणी मृत मधमाशाही सापडल्या. शुक्रवारी मृत आढळलेले सर्व पेंग्विन हे केपटाऊनजवळील सिमोनटाऊन या शहरातील आहेत. हा परिसर राष्ट्रीय उद्यान असून आणि केप मधमाश्य़ा या पर्यावरणीय व्यवस्थेचा भाग आहेत, असे रॉबर्ट्स म्हणाले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:54 PM 21-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here