जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सैन्याच्या हेलिकॉप्टरचा अपघात, 2 पायलट मृत्यूमुखी

0

जम्मू काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय सैन्याच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला आहे. शिवगढ धार भागात ही घटना घडली आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच, पोलीस आणि सैन्याच्या टीम शिवगढ धारकडे रवाना झाल्या आहेत. या दुर्घटनेत 2 पायलट शहिद झाले आहेत. मेजर रोहित कुमार आणि मेजर अनुज राजपूत अशी शहिद झालेल्या जवानांची नावं आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, या भागात धुकं जास्त होतं, त्यामुळे पुढे काहीही दिसत नव्हतं. शेवटी काहीच न कळाल्याने हेलिकॉप्टरची क्रॅश लॅण्डिंग करावी लागली. जम्मू-काश्मीर पोलिसांच्या माहितीनुसार स्थानिकांनी हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर शिवगढ धारकडे टीम रवाना करण्यात आल्या. शिवधारच्या पटनीचॉप भागात हे हेलिकॉप्टर पडल्याची माहिती आहे. त्यानुसार रेस्क्यु पथक त्या दिशेने रवाना करण्यात आलं आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:11 PM 21-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here