बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या तिघांना वन विभागाने पकडले

0

रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गावर कोदवली, राजापूर येथील एका पेट्रोल पंपावरून तीन संशयित दुचाकी स्वारांची तपासणी केली असता त्यांच्या बॅगेमध्ये बिबट्या वन्य प्राण्याची कातडी आढळून आल्याने वन्य प्राण्याच्या तस्करी बाबत आरोपी यांना वन विभागाने ताब्यात घेतले आहे. जयेश बाबी परब, रा. शिरोडा,ता. वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग वय -२३ वर्षे, दर्शन दयानंद गडेकर रा. शिरोडा,ता. वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग वय – २०वर्षे, दत्तप्रसाद राजेंद्र नाईक रा. शिरोडा, ता. वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग वय – २२ वर्षे अशी तीन संशयितांची नावे आहेत. आरोपीकडून बिबट्या या प्राण्याची कातडी जप्त करुन घेतली आहे. वरील सर्व आरोपींनी वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम ९,३९,५१,५२ चा भंग केलेला आहे. वरील सर्व आरोपींच्या विरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम ९,३९,५१,५२ नुसार गुन्हा दाखल केलेला आहे. त्यामुळे इतर मुद्देमाल दोन मोटरसायकल गाडी नं- MH ०७AM ३२९४ MH ०७ ११३४९ जप्त करुन ताब्यात घेतले आहेत. तसेच ओप्पो, रेडमी, व्हिवो या कंपन्यांचे मोबाईल आरोपीकडून जप्त करुन ताब्यात घेतले आहेत. सदर आरोपींनी आपला गुन्हा कबुल केलेला आहे. पुढील तपास सुरू आहे. वरील आरोपीना प्रथम वर्ग न्यायालय, राजापूर येथे हजर केले असता श्री.ओमकार अनिल गांगण, सरकारी वकील यांनी सरकारची (वनविभागाची) बाजू योग्य रित्या न्यायालयासमोर मांडल्याने मे. न्यायालयाने सदर आरोपीना दि.२४/०९/२०२१ पर्यंत ४ दिवसांची वन कोठडी दिली आहे. सदरची कार्यवाही मा. मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), कोल्हापूर डॉ. व्ही. क्लेमेंट बेन, मा. विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी (चिपळूण) श्री. दिपक खाडे, सहा. वनसंरक्षक श्री. सचिन निलख यांचे मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वन अधिकारी श्रीमती प्रियंका लगड, वनपाल राजापूर, श्री. स.व.घाटगे, वनपाल लांजा श्री. दि.वि.आरेकर, वनपाल संगमेश्वर श्री. तौ.र.मुल्ला, वनरक्षक राजापूर सागर गोसावी, वनरक्षक कोर्ले श्री. सागर पताडे, वनरक्षक साखरपा, श्री. न्हा.नु.गावडे, वनरक्षक वनउपज तपासणी नाका साखरपा संजय रणधिर, वनरक्षक वनउपज तपासणी नाका साखरपा श्री. राहूल गुंठे यांनी कार्यवाही पार पाडली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
05:25 PM 21/Sep/2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here