मुंबई | महाराष्ट्रातील भाजपचं जहाज संधीसाधू लोकांनी तुडूंब भरलंय. त्यांचं हे जहाज एक दिवस नक्की बुडणार, अशी टीका काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी भाजपवर केली आहे. ओव्हरफ्लो झालेलं जहाज बुडतं हा नियमच आहे, असं म्हणत अशोक चव्हाणांनी भाजपवर आणि पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. यावर अशोक चव्हाण यांनी जळजळीत टीका केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये जोरदार इनकमिंग चालू आहे. आज 31 जुलै रोजी भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादीला जोरदार धक्का दिला.
