खेडच्या शिवचैतन्य पतसंस्थेला आदर्श पुरस्कार

0

खेड : शहरातील शिवचैतन्य नागरी सहकारी पतसंस्थेला कोल्हापूर येथील ए. एस. प्रतिष्ठानच्यावतीने सहकार क्षेत्रातील आदर्श पतसंस्थेसह आदर्श चेअरमन व आदर्श मुख्य कार्यकारी अधिकारी पुरस्कार असे एकूण तीन पुरस्कार प्राप्त झाले आहेत. कोल्हापूर येथील उपनिबंधक महेश कदम यांच्याहस्ते हे पुरस्कार नुकतेच प्रदान करण्यात आले. शिवचैतन्य नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अरविंद तोडकरी, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनय महाजन व उपाध्यक्ष मिलिंद इवलेकर यांनी हे पुरस्कार स्वीकारले. सहकार क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हे पुरस्कार देण्यात आले. शिवचैतन्य पतसंस्थेकडून सहकार क्षेत्रासह सामाजिक बांधिलकीतून विधायक उपक्रमही राबवण्यात येत असतात. पतसंस्थेने मिळवलेल्या पुरस्काराबद्दल सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:57 PM 22-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here