जागतिक पर्यटन दिनानिमित्ताने रत्नागिरीत अपरिचित रत्नागिरीविषयी परिषद

0

रत्नागिरी : जागतिक पर्यटन दिनानिमित्ताने येत्या २७ सप्टेंबर रोजी रत्नागिरीत अपरिचित रत्नागिरी या विषयावरील परिषद आयोजित करण्यात आली आहे. रत्नागिरीतील पर्यटन वाढविणे या मूळ उद्देशाने रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्थेने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. रत्नागिरीत मारुती मंदिर येथील हॉटेल व्यंकटेश एक्झिक्युटिव्हच्या कॉन्फरस हॉलमध्ये होणार असलेल्या या परिषदेचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील आणि इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचे संचालक डॉ. श्रीधर ठाकूरदेसाई यांच्या उपस्थितीत होईल. यावेळी ग्लोबल कोकणचे अध्यक्ष संजय यादवराव, बँक ऑफ इंडियाचे झोनल मॅनेजर केशव कुमार, रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कीर, रायगडच्या हिरवळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर धारिया उपस्थित राहणार आहेत. चर्चासत्रात पिंपरी चिंचवड सायन्स पार्कचे संचालक सारंग ओक, आनंदवन निवासचे संचालक डॉ. गिरीश बापट, डॉ. श्रीधर ठाकूरदेसाई साताऱ्याचे कृषी पर्यटन अभ्यासक प्रमोद शिंदे, रोबोटिक झू प्रॉडक्शन रोबोटिक डिजिटल गार्डनचे प्रवीण किणे मार्गदर्शन करणार आहेत. इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, निसर्गयात्री संस्था आणि मैत्री ग्रुपच्या सहकार्याने ही परिषद २७ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत होणार आहे. पर्यटनामधील सर्व व्यावसायिक आणि पर्यटनप्रेमींना पर्वणी ठरणाऱ्या या परिषदेला आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन रत्नागिरी पर्यटन सहकारी संस्थेचे अध्यक्ष आणि परिषदेचे निमंत्रक राजू भाटलेकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी राजू भाटलेकर (9130383666), सुहास ठाकूरदेसाई (9822290859), सुधीर रिसबूड (9422372020) किंवा मकरंद केसरकर (9967318481) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:59 PM 22-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here