दिल्ली निवडणुकीत आपचा विजयी वारू भाजपाला रोखता आलेला नाही. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांपैकी 50 पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेत, ‘आप’ने पुन्हा दिल्लीवर झेंडा फडकावला आहे. मात्र दुसरीकडे ‘आप’कडून सत्ता खेचून आणण्यात भाजपला अपयश आलं आहे. तर काँग्रेसचा पुन्हा सुपडासाफ झाला आहे. ‘भाजपला जनतेने नाकारायला सुरूवात केली आहे. दिल्लीत 100 टक्के शहरी लोकसंख्या असून सुशिक्षित वर्ग आहे. तसेच कुणल्याही राज्यकर्त्यांची जबाबदारी समाज एकसंध ठेवण्याची आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवारांनी यांनी दिली आहे.
