चिपळूण नगर परिषदेची आज विशेष सभा

0

चिपळूण : जलसंपदा विभागाकडून चिपळूण शहरासाठी निळी व लाल पूररेषा निश्चित करण्याचे काम सुरू झाले आहे. मात्र, यामुळे शहराच्या विकासाला ‘खो’ बसणार आहे. या पार्श्वभूमीवर चिपळूण नगरपरिषदेची विशेष सभा आज गुरुवार, दि. २३ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. यावेळी पूररेषेबरोबरच पुराबाबतच्या करावयाच्या उपाययोजना यावर चर्चा करून त्याबाबतचा अहवाल शासनाला पाठविला जाणार आहे. चिपळूण न.प.च्या कै. श्रावणशेठ दळी सभागृहात सायंकाळी ४ वा. नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्या उपस्थितीत ही सभा होणार आहे. पूररेषा निश्चित करण्यासाठीच्या सुरू असलेल्या कामाला तातडीने स्थगिती द्यावी, पूररेषा निश्चित करण्यासाठी पुन्हा सर्वेक्षण करावे यावर चर्चा केली जाणार आहे. शहरात वारंवार येणाऱ्या पुरांबाबत उपाययोजना करण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:15 AM 23-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here