दापोली : तालुक्यातील भोपण पणदेरी येथील प्राची प्रकाश गायकवाड ४५ वर्षीय महिला बेपत्ता झाली आहे. दि. १७ सप्टेंबर रोजी मी आईकडे खेडला जाते, असे आपला भाऊ प्रवीण याला सांगून ही महिला दापोली एसटी स्थानकात गेली. तिथे ती खेड गाडीत बसली देखील. परंतु, खेडला पोहचलीच नाही, अशी तक्रार प्रकाश वसंत गायकवाड यांनी दापोली पोलिस स्थानक येथे नोंदविली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल गायकवाड करीत आहेत.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:43 AM 23-Sep-21