केंद्र सरकारच्या एनआरसी कायद्याच्या विषयामुळे देशभरातील वातावरण ढवळून निघाले असून या कायद्याच्या विरोधात व समर्थनार्थ मोर्चे निघत आहेत. या कायद्याच्या संभाव्य नियमांनुसार आपल्याला रहिवासी असल्याची कागदपत्रे द्यावी लागतील या धास्तीने शहरातील मुस्लीम समाजातील नागरिकांनी रत्नागिरी नगरपालिकेत जन्म दाखल्यांसाठी गर्दी केल्याचे पहावयास मिळत आहे. हे दाखले मिळवण्यासाठी दिवसाला सरासरी १८० अर्ज नगरपालिकेकडे दाखल होत आहेत. इतर वेळीपेक्षा हे प्रमाण तिपटीने वाढले आहे.
