रत्नागिरी : तालुक्यातील जाकादेवी, खालगाव, धाऊलवाडी येथे अवैधरित्या दारू बाळगल्याप्रकरणी दत्ताराम सदानंद गोताड (५७,रा. जाकादेवी) याच्या विरुद्ध ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामीण पोलिसांनी मंगळवारी ही धाड टाकली. त्याच्याकडून ५६० रुपये किमतीची १० लीटर गावठी दारू जप्त करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल किशोर जोशी करत आहेत.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:32 PM 23-Sep-21