लांजा महाविद्यालयाच्या राज्यस्तरीय पत्रलेखन स्पर्धेचा निकाल जाहीर

0

लांजा : लांजा येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील मराठी विभगाच्या वतीने राज्यस्तरीय ऑनलाईन पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून कल्याण येथील श्रद्धा वझे यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. या स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे : प्रथम क्रमांक : श्रद्धा वझे- कल्याण, द्वितीय – सिद्धी परब- सिंधुदुर्ग, तृतीय – अंजली पिलणकर – रत्नागिरी, उत्तेजनार्थ – डॉ. अरुणा फिरोदिया- सातारा, मंजुश्री भागवत-देवरूख, प्रेमला बराटे- पुणे व सिमरन शेख- लांजा यांनी यश मिळवले. विजेत्यांना प्रथम क्रमांक – रु.१०००, द्वितीय रु. ७५०, तृतीय रु. ५०० व उत्तेजनार्थ प्रत्येकी रु.२५० व प्रमाणपत्र व सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने वितरित करण्यात आली आहेत. या स्पर्धेचे संयोजन मराठी विभागप्रमुख डॉ. महेश बावधनकर यांनी केले होते. स्पर्धेतील सर्व विजेत्यांचे व सहभागी स्पर्धकांचे अभिनंदन न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जयवंत शेट्ये, उपाध्यक्ष सुनील कुरूप, सचिव विजय खवळे, सर्व पदाधिकारी, प्राचार्य डॉ. अरविंद कुळकर्णी, मराठी विभाग प्रमुख डॉ. महेश बावधनकर, प्रा. सचिन गिजबिले, उपप्राचार्य डॉ. के.आर. चव्हाण यांनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:16 PM 23-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here