सिंधुदुर्ग विमानसेवेला भरघोस प्रतिसाद; अवघ्या तासाभरात 20 ऑक्टोबरपर्यंतची तिकिटे संपली

0

सिंधुदुर्ग : ‘मुंबई ते सिंधुदुर्ग आणि रिटर्न’ या हवाई प्रवासाची तिकीट विक्री गुरुवारपासून सुरू झाली, पण अवघ्या तासाभरातच 20 ऑक्टोबरपर्यंतचे आरक्षण फुल्ल झाले. 9 ऑक्टोबरपासून सिंधुदुर्गात हवाईसेवा सुरू होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे 9 ऑक्टोबरला उद्घाटन होणार आहे. एअर इंडियाच्या ‘अलायन्स एअर’ या उपकंपनीमार्फत मुंबई ते सिंधुदुर्ग मार्गावर विमान उडणार आहे. मुंबई ते सिंधुदुर्गसाठी 2520 रुपये तर सिंधुदुर्ग ते मुंबई परतीच्या प्रवासासाठी 2621 रुपये तिकीट दर आहे. दररोज सकाळी 11 वाजून 35 मिनिटांनी मुंबईहून निघालेले विमान दुपारी 1 वा. चिपी येथे उतरेल. तर परतीचा प्रवास दुपारी 1 वाजून 25 मिनिटांनी सुरू होईल आणि विमान 2 वाजून 50 मिनिटांनी मुंबईत पोहोचेल.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
10:27 AM 24-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here