ओणी-रायपाटण मार्गे अणुस्कुरा रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी

0

राजापूर : काँग्रेस नेत्या व माजी विधान परिषद आमदार अॅड. हस्नबानू खलिफे यांनी राजापूर तालुक्यातील ओणी-सौंदळ-खडीकोळवणयेळवण-रायपाटण-पाचल-कारवली-पांगरी-अणुस्कुरा या राज्यमार्गाचे डांबरीकरण तत्काळ करण्यात यावे, अशी मागणी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे केली आहे. विशेष रस्ता दुरुस्ती योजनेतून या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. त्यामुळे लवकरच डांबरीकरण होईल, अशी अपेक्षा खलिफे यांनी व्यक्त केली आहे. या राज्य मार्गावर अनेक खड्डे पडले असल्याने या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वाहनचालकांना वाहने चालवताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. गाड्यांचेही मोठे नुकसान होत आहे. ही वाहनचालकांची समस्या अॅड. खलिफे यांनी ना. चव्हाण यांच्यासमोर मांडली. रस्त्याचे डांबरीकरण अथवा दुरुस्ती होणे आवश्यक आहे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
11:49 AM 24-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here