शासकीय तंत्रनिकेतन मध्ये तात्पुरते अधिव्याख्याता पद भरणार

0

रत्नागिरी : शासकीय तंत्रनिकेतन रत्नागिरी या संस्थेत सन २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षाकरिता तात्पुरत्या स्वरूपात तासिका तत्त्वावर अधिव्याख्याता पदांसाठी नियुक्ती करण्याकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. ही नियुक्ती पुढील अभ्यासक्रमासाठी करण्यात येणार आहे. १) स्थापत्य, यंत्र, विद्युत अणुविद्युत, संगणक, मॅकेट्रॉनिक्स, अभियांत्रिकी, उपयोजित यंत्रशास्त्र शैक्षणिक अहर्ता- बी. ई. प्रथमश्रेणी, २)औषधनिर्माणशास्त्र- शैक्षणिक अहर्ता बी. फार्म प्रथमश्रेणी, ३) गणित-शैक्षणिक अहर्ता-एम.एससी. प्रथमश्रेणी. यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी आपला अर्ज, मूळ प्रमाणपत्र व झेरॉक्स प्रतीसह २८ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजता १) मुख्य इमारत संबंधित विभाग – स्थापत्य, विद्युत, उपयोजित यंत्रशास्त्र, गणित, औषध निर्माणशास्त्र, २. विस्तारित इमारत संबंधित विभाग – अणुविद्युत, संगणक, यंत्र, मॅकेट्रॉनिक्स विभागात उपस्थित राहावे, असे आवाहन शासकीय तंत्रनिकेतन, रत्नागिरी यांनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:01 PM 24-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here