चिपळुणात ३ ऑक्टोबरला बांबू लागवड प्रशिक्षण

0
wallup.net

चिपळूण : कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून चिपळूण येथे जिल्हास्तरीय बांबू लागवड व प्रक्रिया उद्योग या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ३ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेमध्ये कापसाळ येथील लक्ष्मीबाई माटे सभागृहात प्रशिक्षण होणार आहे. या कार्यशाळेत बांबू विषयातील तज्ज्ञ डॉ. हेमंत बेडेकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. डॉ. बेडेकर हे चिपळूण तालुक्यातील वेहेळेचे सुपुत्र असून त्यांनी ‘सह्याद्रीतील बांबू’ या विषयावर डॉक्टरेट मिळवली आहे. यावेळी ते उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. जिल्ह्यातील हवामान बांबू पिकासाठी आवश्यक असून त्यातून शेतकऱ्यांना रोजगाराची संधी मिळू शकते. त्यामुळे या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन बापू काणे यांनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:03 PM 24-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here