पुण्यात लवकरच आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रश्न मार्गी लागेल : नितीन गडकरी

0

पुणे : सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूलाचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होत आहे. यानिमित्त बोलताना गडकरींनी पुण्यातील प्रकल्पांविषयी माहिती दिली. तसंच पुण्यात लवकरच आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रश्न मार्गी लागेल असंही त्यांनी सांगितलं. आपल्याला दोन गोष्टींचे समाधान वाटले असेही ते पुण्यातील कार्यक्रमात बोलताना म्हणाले. यात पुणे मेट्रो आणि दुसरा विमामतळाचा विषय असल्याचं त्यांनी सांगितलं.मी एक नवी मेट्रो शोधलीये. त्याची कॉस्ट एक कोटी रुपये पर किलोमीटर. ८ डब्ब्यांची ही मेट्रो. बिझनेस क्लास आहे. एअर होस्टेस सगळं असणार. या मेट्रोचा वेग ताशी १२० किंमीने असेल म्हणजे आता चंद्रकांत दादा तुम्हांला ३:३० तासांत कोल्हापुरला जाता येईल. इथे बेरोजगार लोकांना नोकरी देणार असेही गडकरी म्हणाले. मेट्रोच्या या कामासाठी काही पैसे न घेता मी कन्सल्टंट बनण्याासठी मी तयार आहे. यामध्ये इंटरनेट, वायफाय, टेलिव्हिजन मोफत मिळणार आहे. याचं तिकिट एसटीच्या तिकिटाइतकं असेल. त्याचं स्पीड तासाला १४० इतकं आहे. चंद्रकांत दादा तुम्हाला या ट्रेनने तुम्हाला पावणे तीन ते तीन तासात कोल्हापूरला जाता येईल आणि स्टेशनलाच थांबेल असं गडकरी म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:43 PM 24-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here