कवीवर्य द्वारकानाथ शेंडे पुरस्कार जाहीर

0

चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वतीने देण्यात येणारा सामाजिक कार्यासाठीचा कविवर्य द्वारकानाथ शेंडे पुरस्कार शेती व्यवसायातील प्रसिद्ध राजवाडी पॅटर्नचे प्रणेते सतीश कामत यांना जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती ‘लोटिस्मा’चे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव व कार्यवाह धनंजय चितळे यांनी दिली आहे. ‘लोटिस्मा’च्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जून २००७ पासून कामत हे संगमेश्वर तालुक्यातील त्यांचे मूळगाव असलेल्या राजवाडी येथे पीपल्स इम्पॉवरिंग मूव्हमेंट (पेम) या संस्थेमार्फत विविध उपक्रम राबवत आहेत. कृषी क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडविणाऱ्या यशस्वी ‘राजवाडी पॅटर्न’चे ते प्रणेते आहेत. लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे वार्षिक यमुनाबाई मालशे पुरस्कार, ग्रंथमित्र पुरस्कार, डॉ. मो. गो. कानडे आदर्श वाचक पुरस्कार, ज्येष्ठ महिला वाचक पुरस्कार, आदर्श वाचक पुरस्कार आदी महिन्याभरात जाहीर होणार आहेत. ‘कादंबरी’साठीचा मनबोली पुरस्कार आणि कविता संग्रहासाठीच्या मृदंगी पुरस्कार विजेत्यांची नावे लवकरच जाहीर करण्यात येतील, असे वाचनालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:54 PM 24-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here