ना. उदय सामंत यांचा रत्नागिरीचा झंझावाती दौरा

0

रत्नागिरी : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. उदय सामंत हे तीन दिवस रत्नागिरी शहराचा झंझावाती दौरा करणार असून विकास कामांच्या उद्घाटनाबरोबरच प्रभागात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. शनिवारी दुपारी ४ वा. प्रमोद महाजन क्रीडा संकुल सुशोभीकरण उद्घाटन होणार आहे. त्यानंतर ४.३० वा. उद्यमनगर पटवर्धनवाडी येथे बाळासाहेब ठाकरे सभागृह व देवळेकर उद्यान उद्घाटन करणार आहेत. या कार्यक्रमानंतर ते सायं. ५ वा. ठाकरे सभागृहात रत्नागिरी नगर परिषद प्रभाग क्र.३मधील कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत. सायं ६ वा.सन्मित्रनगर लांजेकर कंपाऊंड येथील लक्ष्मीकेशव बहुउद्येशीय हॉलचा शुभारंभ करणार असून, याच ठिकाणी ते प्रभाग क्र.२ कार्यकत्यांशी संवाद साधणार आहेत. सायं.७ वा. परटवणे साईमंदिर येथे प्रभाग क्र.१ मध्ये बैठक घेणार आहेत. त्यानंतर रात्री ८ वा. कोकणनगर येथील डॉ. आंबेडकर सभागृहात प्रभाग क्र.४ च्या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. रविवार २६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून प्रभागांच्या भेटीगाठी दौरा सुरू करणार असून साळवीस्टॉप येथील अॅक्टिव्हिटी सेंटरमध्ये प्रभाग क्र.५ बैठकीस उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर सकाळी ११ वा. दैवज्ञ भवन येथे प्रभाग क्र.६, दुपारी १२ वा.जयेश मंगल कार्यालय येथे प्रभाग क्र.७च्या कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत. दुपारी ४ वा. रामआळीतील राममंदिर येथे प्रभाग क्र.८ च्या कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत. सायं ५ वा. मराठा भवन येथे श्री मंगलमूर्ती सजावट स्पर्धा कार्यक्रमाच्या बक्षीस वितरणास उपस्थित राहणार आहेत. सायं ७ वाजता मंगल कार्यालय रत्नागिरी प्रभाग क्र.९ च्या बैठकीत उपस्थित राहणार आहेत. रात्री ८ वा. भैरव मंगल कार्यालय येथे प्रभाग क्र.१० तर रात्रौ ९ वा. पांढरा समुद्र नाका येथे प्रभाग क्र.११ बैठकीत कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. सोमवार २७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वा. रत्नागिरी तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींचे स्मार्ट कार्ड-प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमास जिल्हा परिषद येथील स्व. शामराव पेजे सभागृह उपस्थित राहणार आहेत. दु. १२ वा. रत्नागिरी तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय नवीन इमारत बांधकामाचे भूमिपूजन उद्यमनगर येथील महिला रुग्णालयाजवळ होणार आहे. दुपारी १.३० वा. ग्रामपंचायत कोंडये कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. त्या नंतर दुपारी २ वा. फुणगूस पंचायत समिती विभागाची आढावा बैठक कोंडये येथे होणार आहे. त्यानंतर दुपारी ३.३० ते सायंकाळी ५.३० वा दरम्यान, रत्नागिरी जिल्हयातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्तांना केलेल्या मदत वाटपबाबत आढावा घेणार आहे. कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर केलेल्या उपाययोजनांची माहिती, उर्दू भवन बाबत आढावा बैठक, राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन आणि खोक्यांचे पुनर्मूल्यांकन संदर्भात आढावा बैठक, जिल्हा खनिकर्म विकास निधी संदर्भात आढावा बैठक, मिऱ्या शिरगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना व राष्ट्रीय जल जीवन मिशन अंतर्गत रत्नागिरी मतदार संघातील प्रलंबित कामांबाबत आढावा बैठक, पाली येथील बस स्थानकाच्या विकासकामांची बैठक घेणार आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:29 AM 25-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here