गणपतीपुळे अंगणवाडीत पोषण माह सप्ताह संपन्न

0

गणपतीपुळे : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प रत्नागिरी अंतर्गत संपूर्ण जिल्हाभर सुरू असलेला पोषण माह सप्ताह कोविड प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन करत नुकताच रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे केदारवाडी अंगणवाडीत संपन्न झाला. यावेळी आयोजित कार्यक्रम पंचायत समिती रत्नागिरीचे सदस्य गजानन कमलाकर तथा आबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाला. सुरुवातीला सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी पोषण माह यशस्वी होण्यासाठी आणि या सप्ताहाचे महत्व पटावे गणपतीपुळे केदारवाडी अंगणवाडीच्या माध्यमातून जनजागृतीपर विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये पाककृती स्पर्धा, सुदृढ बालक स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, सायकल रॅली इत्यादी स्पर्धा घेऊन या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच पोषण माह सप्ताहांतर्गत गरोदर माता, स्तनदा माता किशोरवयीन मुली यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती आणि शासनाकडून पुरविण्यात आलेल्या साधनांचे वितरण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष गजानन पाटील यांनी सांगितले की, ग्रामीण भागात अंगणवाडी ह्या अत्यंत नियोजनबद्ध कार्य करत आहेत, त्यामुळे एकात्मिक बाल विकास योजनेचा हेतू सफल होत आहे. लहान मुलांना योग्य पोषण मिळाल्यास तीच मुले भविष्यात समाजाचा आधार बनणार आहेत. तसेच गरोदर माता आणि स्तनदा माता यांनाही पोषण आहाराचे महत्व समजल्यास बाळाच्या आरोग्यासाठी योग्य राहते. आणि यासाठी अंगणवाडीच्या माध्यमातून मार्गदर्शन होत असल्याने सामाजिक आरोग्य टिकून राहण्यास मदत होईल. एकात्मिक बाल विकास योजनेच्या प्रकल्प अधिकारी मालगुंडकर मॅडम ह्या रत्नागिरी तालुक्यात अत्यंत प्रभावी कार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले. यसेच यावेळी उपस्थित असणाऱ्या बाल विकास प्रकल्प अधिकारी अपर्णा मालगुंडकर यांनीही आपले मनोगत व्यक्त करत योजनेचे स्वरूप आणि महत्व स्पष्ट केले. त्यासोबतच गणपतीपुळे ग्रामपंचायतच्या सरपंच कल्पना पकये यांनीही या उपक्रमाची उपयुक्तता सांगत गावातील अंगणवाडीतुन सर्वांनीच पुढाकार घेतल्यास महिला सुदृढकरण आणि बाल विकास व्हायला मदत होईल असा आशावाद व्यक्त केला. तसेच आरोग्य सेवक सातव यांनीही या पोषण माह सप्ताहाचे महत्व आपल्या मनोगतातून सांगितले. तर कार्यक्रमाला उपस्थित असणारे सामाजिक कार्यकर्ते ऍड. तुषार नागवेकर, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मधुरा जाधव यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष गजानन पाटील, बाल विकास प्रकल्प अधिकारी अपर्णा मालगुंडकर, गणपतीपुळे ग्रामपंचायत सरपंच कल्पना पकये, उपसरपंच महेश केदार यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते राजू साळवी, अंगणवाडी पर्यवेक्षिका रोहिणी भोसले, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मधुरा जाधव,, अँड. तुषार नागवेकर, गणपतीपुळे शाळेच्या मुख्याध्यापिका जोशी मॅडम, सहकारी शिक्षक नीलकंठ पांपटवार, राजेश हळदणकर, ग्रामपंचायत सदस्य, स्तनदा माता, गरोदर माता, किशोरवयीन मुली, बालक आणि पालक उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:19 AM 25-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here