मांडकीचा सुपुत्र प्रथमेश राजेशिर्के झाला आयएएस अधिकारी

0

◼️ रत्नागिरी जिल्ह्यातून पहिला आयएएस अधिकारी होण्याचा पटकावला मान

➡ चिपळूण : चिपळूण तालुक्यातील मांडकी गावचे सुपुत्र प्रथमेश अरविंद राजेशिर्के यांनी दिल्ली येथे झालेल्या २०२० च्या युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होत रत्नागिरी जिल्ह्यातून पहिला आयएएस अधिकारी म्हणून निवड होण्याचा मान पटकावला आहे. मांडकी गावचे माजी उपसरपंच, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेश राजेशिर्के यांचा प्रथमेश हा भाऊ असून प्रथमेश यांनी खूप परिश्रम करून मिळवलेल्या यशाबदल राजेशिर्के परिवार यांनी खूप समाधान व्यक्त केले आहे. चिपळूण विधानसभा आमदार शेखर निकम, यंग बॉईज क्रिकेट क्लब सावर्डे, शेखर निकम युवा मंच सावर्डे यांनी तसेच सावर्डे पंचक्रोशीतून त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
11:14 AM 25-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here