रत्नागिरी : महसूल कर्मचाऱ्यांच्याप्रलंबितमागण्यांबाबतसहा वर्ष उलटूनही शासनाकडून कोणताही निर्णय न झाल्याने महसूल कर्मचाऱ्यांनी ११ जुलैपासून आंदोलनाचे हत्यार उपसले असून, मंगळवारी कर्मचाऱ्यांनी काळ्याफिती लावून शासनाच्या धोरणांचा निषेध केला. राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्यावतीने विविध मागण्यांसाठी महसूल मंत्री व सचिव यांच्याशी २०१३पासून २०१९ पर्यत आठ बैठका घेण्यात आल्या. सहा वर्षाचा कालावधी उलटूनही महसूल कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत. उलट शासनाकडून आश्वासने देऊन कर्मचाऱ्यांची फसवणूक होत असल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष वाढीस लागला आहे. शासनाकडून कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार होत नसल्याने आंदोलनाचा मार्ग धरला आहे. ११ जुलै २०१९ पासून निदर्शने करुन या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. मंगळवार ३० जुलै रोजी काळ्या फिती लावून तिसऱ्या टप्प्यातील आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले व शासनाचा निषेध केला. जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व तालुक्यातील तहसीलदार व राजापूर, चिपळूण, खेड प्रांत कार्यालयातील महसूल कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले. यापुढे शासनाने लक्ष न दिल्यास ९ ऑगस्ट रोजी कर्मचारीवर्ग एक तास जादा चे काम करून निषेध व्यक्त करणार आहेत. यानंतरही शासनाने कर्मचाऱ्यांची बाजू समजून घेतल्यास १६ ऑगस्ट रोजी लेखणी व संगणक बंद कामकाज केले जाणार आहे. २१ ऑगस्टरोजीसामुदायिकरजाटाकनधरणे आंदोलन छेडले जाणार आहे. २८ ऑगस्ट रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला जाणार आहे. याही उपर शासनाने दखल न घेतल्यास ५ सप्टेंबरपासून बेमुदत संप पकारला जाणार असल्याची माहिती महसूल कर्मचारी संघटनेने दिली आहे.
