देवरूख : कोल्हापूर विभागातील शैक्षणिक संस्था संघाची बैठक सोमवार, २७ सप्टेंबर रोजी देवरूख येथे आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात होणार आहे. शैक्षणिक संस्थांच्या अनेक महत्त्वाच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा करून कार्यवाहीबाबत निर्णय घेण्यासाठी ही बैठक होणार आहे. या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला जाणार आहे. देवरूख महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये ही पत्रकार परिषद होणार आहे. कोरोना काळात शिक्षण संस्थांसमोर अनेक अडचणी उभ्या राहिल्या आहेत. याकडे शासनाचे लक्ष वेधून पुढील संस्थांची भूमिका स्पष्ट केली जाणार आहे, अशी माहिती सदानंद भागवत यांनी दिली आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:12 PM 25-Sep-21