रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी २०२०

0

ही स्पर्धा म्हणजे टेनिस बॉल क्रिकेटचं मादक सौंदर्य दर्शवनारी एक नेत्रदीपक स्पर्धा. या नेत्रदीपक स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी श्रावणी XI व किंग्स ऑफ अथैया या दोन महान संघांनी केला स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश. तर YCC पावस,मातोश्री XI,जागृती XI,रत्नागिरी कुवैत या बलाढ्य संघांना पराभवाचा सामना करावा लागला.

IMG-20220514-WA0009

श्रावणी XI संघाने पहिले दोन सामने एकहाती जिंकल्यानंतर तिसऱ्या सामन्यात म्हणजेच उप-उपांत्य फेरीत जागृती XI संघविरुद्ध आपल्या गोलंदाजीच्या जोरावर सहज विजय मिळवत केला स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश. श्रावणी XI संघाने नाणेफेक जिंकून जागृती XI संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. श्रावणी XI संघाच्या गोलंदाजांनी अक्षरशः आपल्या कर्नाधाराचा विश्वास पणाला लावत केली आपल्या खोलवर पध्दतीच्या भेदक गोलंदाजीची कमाल. प्रजोत अंभीरे (२-०-९-०),प्रीतम बारी (२-१-३-२),मुसा पटेल (१-०-६-१),अनिकेत राऊत(१-०-७-१) या महान गोलंदाजांनी अशी वाखाणण्याजोगी गोलंदाजी करत या ६ षटकाच्या सामन्यात जागृती 11 संघाला अवघ्या ३० धावांत रोखलं तर हे ३० धावांच लक्ष श्रावणी XI संघाने १० गडी राखून सहज पूर्ण करत एका मोठ्या विजयाची नोंद आपल्या नावी करत केला उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित. श्रावणी 11 संघामार्फत योगेश चौधरीने ८ चेंडूंचा सामना करत २ चौकार व ३ षटकार ठोकत कुटल्या स्वतःच्या वैयक्तिक २९ धावा नाबाद
मागील दोन सामन्यासहित या ही सामन्यात आपल्या उजव्या हाताच्या खोलवर पद्धतीचा जलदगती मारा करत २ षटकात १ निर्धाव षटक हाताळत अवघ्या ३ धावा खर्च करत २ दोन बलाढ्य गडी मिळवणारा एक महान गोलंदाज मिस्टर.प्रीतम बारी ठरला सामन्यातील सामनावीर, प्रीतमने स्पर्धेतील चौथं तसेच स्वतःच वैयक्तिक दुसरे निर्धाव षटक हाताळत आपल्या गोलंदाजीच्या जोरावर स्पर्धेतील हे दुसरं सामनावीराचं पारितोषिक आपल्या नावी केलं.
उपांत्य फेरीत प्रवेश करणारा स्पर्धेतील पहिला संघ ठरला तो म्हणजे श्रावणी XI.

किंग्स ऑफ अथैया संघाने उप-उपांत्यपूर्व दिला बलाढ्य टिंगरे सरकार संघाला पराभवाचा धक्का, टिंगरे सरकार संघाने नाणेफेक जिंकून किंग्स ऑफ अथैया संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले तदनंतर हा निर्णय टिंगरे सरकार संघाला बराच महागात पडला, किंग्स ऑफ अथैया संघ प्रथम फलंदाजी करत असताना संघाचा कर्णधार.अजित मोहिते स्वस्तात बाद झाल्यानंतर मैदानात काय झालं.तर किंग्स ऑफ अथैया संघामार्फत मैदानात आली रजत मुंढे नावाची सुनामी, या सुनामीचा जोरदार तडाखा टिंगरे सरकार संघाला बसला व त्यांना या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला, रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील चांभार्ली गावचा चमचमता सीतारा मिस्टर. रजत मुंढे ने २० चेंडूंचा सामना करत गोलंदाजांचा भरगोस समाचार घेत ४ चार प्रेक्षणीय चौकार तसेच ६ उतुंग षटकार ठोकत कुटल्या स्वतःच्या वैयक्तिक ६२ धावा नाबाद, आयोजकांसहित संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाची मनें जिंकत या रजतने लगावले स्पर्धेतील पहिले अर्धशतक. सहित त्याचा साथी फलंदाज मिस्टर.मयुर दातीलकरने रजतला योग्य ती साथ देत १२ चेंडूंचा सामना करत कुटल्या स्वतःच्या २४ धावा नाबाद
रजत आणि मयुर या जोडीने नाबाद ८२ धावांची भागीदारी रचत या स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वात मोठी भागीदारी रचण्याचा विक्रम आपल्या नावी केला.
या धमाकेदार फलंदाजीच्या जोरावर या ६ षटकाच्या सामन्यात किंग्स ऑफ अथैया संघाने टिंगरे सरकार संघासमोर १०० धावांच भलंमोठं आव्हान ठेवले. किंग्स ऑफ अथैया संघाने टिंगरे सरकार संघाला १०० धावांच आव्हान दिले असताना किंग्स ऑफ अथैया संघाच्या गोलंदाजांनी देखील कमालीची गोलंदाजी केली. मयुर वाघमारे (२-१-४-१),सुहास पवार (१-०-८-०),रजत मुंढे (१-०-७-१),रवी बुम्बक (२-०-२१-२) गोलंदाजांनी अशी अचूक टप्प्याची गोलंदाजी करत सामन्यात तब्बल ५८ धावांनी विजय प्राप्त करत आपल्या संघाला मिळवून दिला स्पर्धेच्या उप-उपांत्य फेरीत प्रवेश. फलंदाजी करत असताना २० चेंडूत ६२ धावा नाबाद कुटणारा तसेच गोलंदाजी करत असताना १ षटक हाताळत अवघ्या ७ धावा देत १ बलाढ्य गडी बाद करत संपूर्ण प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अष्टपैलू कामगिरीच अधिराज्य गाजवणारा अनमोल हिरा म्हणजेच रजत मुंढे ठरला सामन्यातील सामनावीर.

उप-उपांत्य फेरीत किंग्स ऑफ अथैया संघाने दिला YCC पावस या सर्वाधिक लोकप्रिय संघाला पराभवाचा धक्का. YCC पावस संघाने नाणेफेक जिंकून किंग्स ऑफ अथैया संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले, या ६ षटकाच्या सामन्यात किंग्स ऑफ अथैया संघ प्रथम फलंदाजी करत असताना संघाचा कर्णधार.अजित मोहिते याने आपल्या डावाची सुरवात रंगतदार अवस्थेत केली. अजित मोहिते सुरवातीपासून एका बाजूने खिंड लढवत असताना त्याचे साथी फलंदाज सुमित डोंगडे,रजत मुंढे,मयुर दातीलकर,सुहास पवार हे सर्वच फलंदाज स्वस्तात बाद झाले. तदनंतर अजित मोहिते आपल्या स्वतःच्या वैयक्तिक २५ धावा करून बाद झाल्यानंतर असें वाटू लागले की YCC पावस संघ सामन्यावर एकहाती पकड मिळवतोय की काय? परंतु पहिल्या डावाच्या शेवटच्या षटकात अक्षरशः सामन्याच चलचित्रच बदलले. किंग्स ऑफ अथैया संघाचा उजव्या हाताचा संकटमोचक फलंदाज रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील मुळेखंद गावचा सुपरस्टार मिस्टर.जीवित म्हात्रे याने डावाच्या शेवटच्या षटकात नाजीम गुल्ली सारख्या विक्रमवीर गोलंदाजाच्या गोलंदाजीवर घनागाती हल्ला चढवत ४ उतुंग षटकार लगावत ६ चेंडूंचा सामना करत स्वतःच्या वैयक्तिक २४ धावा कुटल्या आणि ६ षटकात YCC पावस संघासमोर ७० धावांच तगडे आव्हान ठेवलं. YCC पावस संघामार्फत साकीब खान याने कमालीची गोलंदाजी केली. साकीबाने २ षटक हाताळत अवघ्या ९ धावा खर्च करत केले ९ बलाढ्य गडी बाद. सहित मोहम्मद इम्रानने १ षटक हाताळत अवघ्या ८ धावा देत केले २ बलाढ्य गडी बाद.
YCC पावस संघ ७० धावांचा पाठलाग करत असताना त्यांचा हुकमी सलामीवीर म्हणजेच मुन्ना शेख स्वस्तात बाद झाला तदनंतर त्याचा साथी लोकप्रिय उस्मान पटेल ने डावाला आकार देण्यास सुरुवात केली खरी परंतु उस्मानने ही प्रेक्षकांना नाराज करत ७ चेंडूचा सामना करत ३ चौकारांच्या साहाय्याने स्वतःच्या वैयक्तिक १५ धावा कुटत तंबूचा रस्ता गाठला.
सामना कधी किंग्स ऑफ अथैया संघाच्या बाजूने झुकू लागला तर कधी YCC पावस संघाच्या बाजूने झुकू लागला. उस्मान पाठोपाठ उमर खान,गईसुद्दीन शेख,अमोल दुबे,अरविंद राणा,अतिष केदारी हे सर्व हुकमी फलंदाज स्वस्तात बाद झाले, तदनंतर YCC पावस संघाला १० चेंडूत २८ धावांची गरज असताना किंग्स ऑफ अथैया संघ सामन्यावर एकहाती वर्चस्व प्रस्थापित करतोय की काय असे वाटू लागले असताना फलंदाजीला आलेल्या साकीब खान ने हा सामना आपल्या फलंदाजीच्या जोरावर रंगतदार अवस्थेत रंगवला. साकीबने रवी बुम्बकच्या जलदगती माऱ्या समोर ४ चेंडूत लगावले ३ उतुंग षटकार.
तदनंतर सामन्याच्या शेवटच्या षटकात अवघ्या १० धावांची गरज असताना या सामन्याने संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाच्या नजरा आपल्या दिशेने वेधून घेतल्या. YCC पावस संघाला ६ चेंडूत १० धावांची गरज असताना मैदानात काय घडलं तर किन्स ऑफ अथैया संघामार्फत जलदगती गोलंदाज, रायगड जिल्ह्यातील इनामपुरी गावचं सहा अक्षरी सुवर्ण म्हणजेचं अंगद पाटील गोलंदाजीला आला आणि या अंगदने केवळ ३ धावा खर्च करत सामना ६ धावांनी आपल्या किन्स ऑफ अथैया संघाच्या बाजूने झुकवला आणि आपल्या किन्स ऑफ अथैया संघाचा उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला.
किन्स ऑफ अथैया संघामार्फत या ही सामन्यात मयुर वाघमारेने कमालीची गोलंदाजी केली मयूरने २ षटकात २३ धावा खर्च करत केले ४ बलाढ्य गडी बाद सहित सुहास पवारने मोक्याच्या क्षणी आपल्या फिरकी गोलंदाजीची कमाल करत १ षटक हाताळत अवघ्या ५ धावा देत केला उस्मान पटेलसारखा बलाढ्य गडी बाद.
मोक्याच्या क्षणी ४ षटकार लगावत २४ धावांची संकटमोचक खेळी करणारा जीवित म्हात्रे ठरला सामन्यातील सामनावीर.

उपांत्य फेरीत प्रवेश करणारा किंग्स ऑफ अथैया हा स्पर्धेतील दुसरा संघ ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here