…तर आधीच्या आणि आपल्या सरकारमध्ये काय फरक राहील?; रोहित पवारांचा घरचा आहेर

0

मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने गट-क आणि गट-ड साठी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागाच्या परिक्षा रद्द झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी देखील ट्विट करत राज्य सरकारवर नाराजी दर्शवली आहे. रोहित पवार म्हणाले की, मागील सरकारने आरोग्य भरती रखडवल्याने आरोग्य व्यवस्था खिळखिळी झाली. आपल्या सरकारने आरोग्य भरती सुरू केली पण गोंधळाचं वातावरण दिसतंय. असंच चालू राहिलं तर आधीच्या आणि आपल्या सरकारमध्ये काय फरक राहील? याचा राज्य सरकारने गांभीर्याने विचार करायला हवा, असं सल्ला रोहित पवार यांनी दिला आहे. परीक्षा सुरळीत होणं आवश्यक होतं. अनेकांची आर्थिक स्थिती सामान्य आहे. परीक्षेला जाण्यासाठी त्यांनी उसने तर काहींनी व्याजाने पैसे आणले,परंतु आता त्यांना आर्थिक भुर्दंड बसलाय. त्यामुळं पुन्हा लवकर परीक्षा घ्यावी आणि त्यावेळी मोफत एसटी प्रवासाचा पर्याय देता येईल का,याचा विचार व्हावा. तसंच पारदर्शकतेसाठी ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्याच्या देखरेखीत परीक्षा घेण्याबाबत विचार व्हावा. सध्या प्रत्येक पदासाठी व प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळी फी आकारली जाते, हे योग्य नाही. सरकारने यात लक्ष घालून परिक्षार्थींच्या हिताचा निर्णय घ्यावा, ही विनंती, असल्याचं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:11 PM 25-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here