गणपतीपुळे येथे मदत ग्रुपतर्फे आज रक्तदान शिबिर

0

रत्नागिरी : रक्ताचा तुटवडा भासत असल्या कारणाने जिल्हा शासकीय रक्तपेढीच्या सहकार्याने मदत ग्रुपतर्फे गणपतीपुळे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, दि. २७ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वा. या वेळेत शिबिर होणार आहे. तरी रक्तदान करून मदत कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. श्री चंडिका देवी मंदिर, गणपतीपुळे येथे हे शिबिर होणार असून अधिक माहितीसाठी योगेश पालकर, सिद्धेश माने, सचिन सुर्वे यांच्याकडे संपर्क साधावा. पहिला किंवा दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवस पूर्ण असावेत. वजन ५० किलो व वय १८ पूर्ण असणाऱ्या दात्यांनी शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:30 AM 27-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here