२९ फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात पाच दिवसांच्या आठवड्याला ठाकरे सरकारकडून कौल

0

ठाकरे सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना आता 29 फेब्रुवारीपासून 5 दिवसाचा आठवडा लागू होणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांची प्रलंबित मागणी अखेर पूर्ण झाली असून शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. यावेळी ठाकरे सरकारने 29 फेब्रुवारीपासून 5 दिवसाचा आठवडा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा असावा अशी मागणी अनेक दिवसांपासून होत होती. अखेर ठाकरे सरकारकडून ही मागणी पूर्ण झाली आहे. आठवडा 5 दिवसांचा असावा, अशी मागणी गेली अनेक वर्ष राज्य शासनाचे कर्मचारी करत होते. अखेर त्यांच म्हणणं सरकारने विचारात घेतलं. इथून पाठीमागे दुसरा आणि चौथा शनिवार सुट्टी असायची मात्र आता प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सरकारच्या कर्मचाऱ्यांना सुट्टी असणार आहे. ठाकरे सरकारने 5 दिवसांचा आठवडा करून सरकारी कर्मचाऱ्यांना गोड गिफ्ट दिलं आहे. या निर्णयाने सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये नक्कीच आनंदाचं वातावरण असणार आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here