रत्नागिरी: साईश्री नृत्यकलामंदिरची 21 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त भरतनाट्यम हे शास्त्रीय नृत्य रत्नागिरीत सर्वप्रथम सुरु करणाऱ्या सौ. मिताली भिडे यांनी विद्यार्थिनीसमवेत केक कापून 21 years anniversary साजरी केली. रत्नागिरीत सर्वप्रथम भरतनाट्यम सुरु करून केवळ 2 मुलींपासून लावलेलं हे रोपटं आज 100 मुलींचा वटवृक्ष बनलाय. सौ. मिताली भिडे यांनी विचार मांडताना म्हणाल्या, ”आज खूप आनंद होत आहे. गेली 30-32 वर्षे मी नृत्यसाधना करतेय शास्त्रीय नृत्याचा प्रसार आणि प्रचार करतेय. या मध्ये माझे कुटुंबीय आणि सर्व पालकांची खूप मोठी साथ आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या गुरूंशिवाय हे शक्यच नाही. साईश्रीचा हा वृक्ष असाच बहरत राहो, हीच नटराजा चरणी प्रार्थना!”
