जेष्ठ नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबर सुरू

0

रत्नागिरी: महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीमार्फत सर्व प्रथम जेष्ठ नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबर सुरू करण्यात आला आहे. कुवारबाव ग्रामपंचायती मार्फत त्याचा लोकार्पण सोहळा दिनांक 31/01/2020 रोजी साजरा केला गेला. त्यावेळी पोलीस दलातील गायकवाड साहेब, विभूते साहेब, लाड साहेब, भारत संचार निगम लिमिटेड चे जाधव साहेब, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आंबरे साहेब, दानशूर उद्योजक मुकेशशेठ गुंदेचा तसेच कुवारबाव ग्रामपंचायत सरपंच सौ मंजिरी पडाळकर व उपसरपंच श्री सचिन उर्फ बबलू कोतवडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या हेल्पलाईन मुळे जेष्ठ नागरिकांना खालील सुविधा दिल्या जाणार आहेत-
1) 65 वर्षावरील जेष्ठांच्या घरी कोणी तरुण व्यक्ती नसेल आणि जर या टोल फ्री नंबर वर कॉल केला तर त्यांच्या घरी ग्रामपंचायत कर्मचारी जाईल व पाणीपट्टी घरपट्टी किव्हा अन्य कुठलीही ग्रामपंचायत देय रक्कम स्वीकारून त्याची रीतसर पावती देईल.
2) तसेच ज्यांची मुलं बाहेरगावी आहेत व घरी कोणी तरुण व्यक्ती नाही अशा एकट्या राहणाऱ्या वयस्कर व्यक्तींना कॉल आल्यास आवश्यक ती सर्व वैद्यकीय मदत दिली जाईल.
सदर उपक्रमासाठी मदतीचा हात जय भैरी मित्र मंडळ मिरजोळे यांनी दिला आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here