रत्नागिरीत जुगार चालवणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

0

रत्नागिरी : शहरातील हेड पोस्टसमोर असलेल्या पार्किंगमधील आंब्याच्या झाडाखाली असलेल्या टपरीत बेकायदेशीरपणे जुगार चालवणाऱ्या चंदन गजानन सातपुते (३६, रा. सिल्वर प्लाझा धनी नाका, रत्नागिरी) या संशयिताविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवार, २५ सप्टेंबर रोजी दुपारी २.५० वा. करण्यात आली. त्याच्याकडून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ९०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक मोहिते करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:59 PM 27-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here