जिल्हा शासकीय रूग्णालयात जागतिक युनानी दिन साजरा

0

रत्नागिरी: मंगळवार दिनांक 11 फेब्रुवारी रोजी जिल्हा शासकीय रूग्णालय येथे जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या उपस्थितीमधे जागतिक युनानी दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा शासकीय रूग्णालय रत्नागिरी येथे कार्यरत असणाऱ्या युनानी वैद्यकीय अधिकारी डाॅ.निशात धनसे यांनी “आरोग्यासाठी युनानी औषधपद्धती” या विषयावर मार्गदर्शन केले, तसेच हिजामा उपचार पद्धती संदर्भात प्रात्यक्षिकांसह माहिती दिली. या संदर्भात मा. जिल्हा शल्य चिकित्सक व इतर वैद्यकीय अधिकारी यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन युनानी व कपिंग थेरपी विषयीच्या सर्व शंकांचे निरसन केले. सदर कार्यक्रमास रूग्णालयीन कर्मचारी वर्ग, वैद्यकीय अधिकारी तसेच आयुष विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here