रत्नागिरी खबरदारच्या वतीने कराओके गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेची निवड फेरी १६ फेब्रुवारी रोजी साई मंगल कार्यालय रत्नागिरी येथे दुपारी २ वाजता आयोजित करण्यात आली असून अंतिम फेरी १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता संसारे उद्यान, मारुती मंदिर येथे होणार आहे. यास स्पर्धेत भाग घेण्यासाठी पुढील लिंक क्लिक करा https://forms.gle/EVe1vHuCP63NXJHs5 व संपूर्ण प्रवेश अर्ज ऑनलाईन भरा अथवा राखी स्टोअर्स, जुना माळ नाका, रत्नागिरी येथे प्रत्यक्ष संपर्क साधा असे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी १०० रु. प्रवेश शुल्क असून दिनांक १४ फेब्रुवारी पर्यंत १६ वर्षावरील स्पर्धकांनी आपली नावे नोंदवावीत. या स्पर्धेसाठी २ हिंदी किंवा मराठी गाण्यांची तयारी आवश्यक असून या गाण्यांचे कराओके ट्रॅक निवड फेरीच्या वेळी आयोजकांकडे द्यायचे आहेत.
