राजापूर : शहरातील प्रसिद्ध सुवर्णकार आणि राजापूर तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर यांच्या मातोश्री माधुरी अनिल मालपेकर (वय ६८) यांचे रविवारी सकाळी १०.३० राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. गेले काही दिवस त्यांची प्रकृती बरी नव्हती. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, रविवारी त्यांना अधिकच अस्वस्थ वाटू लागले व त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. एक शांत, संयमी व मितभाषी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. पती अनिल मालपेकर यांच्या निधनानंतर पिढीजात सुवर्ण व्यवसायात त्यांनी आपल्या मुलांना बहुमूल्य असे मार्गदर्शन करून भक्कम पाठबळ दिले. त्यांच्या पश्चात संदीप, आनंद, रोहित असे तीन मुलगे, मुलगी लिना, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल रविवारी दुपारनंतर राजापूर बाजारपेठ बंद ठेवून श्रद्धांजली वाहण्यात आली.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:43 PM 27-Sep-21