३ स्क्रीन असणाऱ्या जिल्ह्यातील पहिल्या मल्टीप्लेक्सचे उद्घाटन १३ फेब्रुवारी रोजी ना. उदय सामंत यांच्या हस्ते रत्नागिरीत होणार आहे. शहरातील शिवाजीनगर येथील सिद्धीविनायक गृह प्रकल्पातील मॉलच्या दुसर्या मजल्यावर हे मल्टीप्लेक्स प्रकाश चाफळकर यांनी सुरू केले आहे. येथे दोन स्क्रीन थ्रीडी आणि एक स्क्रीन टूडी आहे. मराठी चित्रपटही येथे दाखवण्यात येणार आहेत.
