मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षेच्या तारखा जाहीर

0

मुंबई : मुंबई विद्यापीठाने 2021 च्या हिवाळी सत्र परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. अद्याप कॉलेज सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय न झाल्याने या सत्रातील परीक्षा सुद्धा ऑनलाईन घेतल्या जाणार आहेत. ऑनलाईन परीक्षा घेतल्या जात असताना बहुपर्यायी प्रश्नपत्रिका मागील वर्षी प्रमाणे विद्यार्थ्यांना सोडवावी लागणार आहे. पारंपरिक कला, वाणिज्य व विज्ञान पदवीच्या सत्र 5 च्या परीक्षा 17 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 2021 दरम्यान होतील. या परीक्षा बहुपर्यायी प्रश्न (MCQ) पद्धतीने ऑनलाईन होणार आहेत. या सत्रात सुद्धा क्लस्टर कॉलेज तयार केले असून क्लस्टर कॉलेज मधील लीड कॉलेजला विद्यापीठाने सत्र परीक्षेची जबाबदारी दिली आहे. सत्र 5 च्या काही परीक्षेचे वेळापत्रक व प्रश्नपेढी विद्यापीठ पाठविणार आहे बीए (एमएमसी ), बीएमएस, बीकॉम (अकाऊंट अँड फायनान्स), बीकॉम (फायनान्शिअल मॅनेजमेंट ) , बीकॉम (बॅंकिंग अँड इन्शुरन्स), बीकॉम ( इन्व्हेस्टमेंट अँड मॅनेजमेंट ), बीकॉम ( फायनान्स अँड मार्केटिंग ), बीकॉम ( ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट), बीएस्सी ( कॉम्प्युटर सायन्स ), बीएस्सी ( बायोटेक्नॉलॉजी), बीएस्सी (ह्युमन सायन्स), बीएस्सी ( आयटी), बीएस्सी ( हॉस्पिटॅलिटी स्टडीज ), बीएस्सी ( एव्हीएशन) व बीएस्सी ( एरोनॉटिक्स) या पदवीच्या पाचव्या सत्राच्या परीक्षेचे वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल तसेच या परीक्षेसाठी प्रश्नपेढी विद्यापीठ पाठविणार आहे. कला , वाणिज्य व विज्ञान पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सत्र 1 व 3, अभियांत्रिकी व औषधनिर्माण शास्त्र पदवी परीक्षा सत्र 7, बीएड परीक्षा सत्र 3, विधी पदवी परीक्षा सत्र 5 व 9 या परीक्षेचे वेळापत्रक स्वतंत्र जाहीर करण्यात येईल व याची प्रश्नपेढी विद्यापीठ पाठविणार आहे. तसेच पारंपरिक कला, वाणिज्य व विज्ञान पदवीच्या सत्र 6 च्या बॅकलॉगच्या परीक्षा 7 ते 20 डिसेंबर 2021 दरम्यान होतील. तर पारंपरिक कला, वाणिज्य व विज्ञान पदव्युत्तर सत्र 2 व 4 च्या बॅकलॉगच्या परीक्षा 1 ते 15 डिसेंबर 2021 दरम्यान होतील.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:35 PM 28-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here